मराठी गीत
आता उठवू सारे रान आता पेटवू सारे रान...2
शेतकर्याँच्या राज्या साठी लाउ पणाला प्राणआता उठवू सारे रान आता पेटवू सारे रान..2
1.किसान मजूर उठतील कंबर लढण्या कसतील..2
एक जुटीची मशाल घेऊन पेटवतील हे रान
आता उठवू सारे रान आता पेटवू सारे रान..2
2. कोण आम्हा अड़विल कोण आम्हा रड़विल..2
अडवणूक करणार्यांची उड़वू दाणा दाण
आता उठवू सारे रान आता पेटवू सारे रान
3.शेतकर्यांची फौज़ निघे हातात त्यांच्या बेड़ी पड़े..2
तिरंगी झेंडे घेती गाती स्वातंत्रयाचे गान
आता उठवू सारे रान आता पेटवू सारे रान..2
4.पड़ून ना राहू आता खाऊना आता लाथा
शेतकरी अन कामकरी मांडणार हो ठाण
आता उठवू सारे रान आता पेटवू सारे रान..2
शेतकर्याँच्या राज्या साठी लाउ पणाला प्राण
आता उठवू सारे रान आता पेटवू सारे रान..4
Comments
Post a Comment